वरखेडी (प्रा अमोल झेरवाल)
आधीचे न्यु. इंग्लिश स्कुल व आताच्या ‘श्रीमती पी. डी. बडोला माध्यमिक विद्यालयात’ 2006-07 ह्या वर्षातील दहावीच्या (१0 वी) च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी श्री. सोनार सर, श्री. विलास के. चौधरी सर, श्री. चव्हाण सर, श्री. अतुल बी. ठोके सर, श्री. जितेंद्र डी. जाधव सर, श्री. कैलास पाटील सर, तसेच सौ. सोनार मॅडम आणि सौ. चौधरी मॅडम उपस्थित होत्या.
सगळ्यांचे भगवे फेटे बांधुन स्वागत करण्यात आले. यानंतर प्रथम दैवत श्री गणेश बाप्पांची आरती व पूजन करण्यात आले. तत्पश्चात, श्री. सतगुरु गुरुदेव दत्त प्रभूंची आरती व पूजन करण्यात आले. आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्याच्या सुरुवातीस, आपल्या तत्कालीन सोबतीला असणारे काही शिक्षक आणि मित्र-मैत्रिणी हे दिवंगत झालेले आहेत, त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व सहभागी सर्व वर्गातील मित्र मैत्रिणी यांचेही गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
त्यानंतर त्यावेळच्या माजी विद्यार्थ्यांच्या संक्षिप्त परिचयाने झाली. प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्री. समाधान पाटील यांनी केले. त्यांनी सर्वजण 17 वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत आल्यावर लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्याचे सांगितले तसेच त्यांनी स्नेहमिलनावर आधारित आपल्या संक्षिप्त चारोळ्या सादर केल्या.
डॉ. श्री. राहुल झेरवाल, सौ. मयुरी मिश्रा, श्री. समाधान पाटील, सौ. आरती, श्री. सुनील वाघ, श्री. गणेश मगर, व सौ. सरला बारी, यांनी या स्नेहमिलन सोहळ्यासाठी पुढाकार घेतला होता. सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून देत असताना, शाळेचे शिक्षकांचे व संस्थेचे उपकार असल्याचे सांगत आभार मानले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात श्री. पंकज देवरे यांनी आपल्या शाळेतील अनुभव विषद करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र आणि गुजरात येथे असणारे सदर बॅचचे मित्र-मैत्रिणी यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
यानंतर मान्यवरांच्या भाषणात श्री. सोनार सर व चौधरी सरांनी आजकालच्या धावपळीच्या जगात आपण आपल्या स्वास्थ्याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे तसेच शरीरासोबतच मानसिक आरोग्याकडे देखील तेवढेच आवर्जून लक्ष दिले पाहिजे, असे सुचविले.
तत्पपश्चात, श्री. ठोके सर, श्री. चव्हाण सर आणि श्री. जाधव सर यांनी इतर महत्वाच्या विषयांना अनुसरून मोलाचे सल्ले दिले. आभार डॉ. श्री. राहुल झेरवाल यांनी मानले. कार्यक्रमाच्या नंतर सर्वांनी स्नेह-भोजनाचा सगळ्यांनी आस्वाद घेतला.