पाचोरा (प्रतिनिधी)
पाचोरा तालुका विधी सेवा समिती, रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्याकडून माऊली बहुउद्देशीय ज्येष्ठनागरिक संघ यांच्यासाठी ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार तसेच सर्कल ऑफ केअर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरिक संघांचे संस्थापक अध्यक्ष राजाराम सोनार, पाचोरा तालुका विधी सेवा समिती व रोटरी क्लब पाचोरा भडगाव
अध्यक्ष डॉ मुकेश तेली, ज्येष्ठ विधी तज्ज्ञ एस पी पाटील, विधी समिती सदस्य प्रा वैशाली बोरकर, भाग्यश्री महाजन, प्रकाश विसपुते, अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख, तालुका अध्यक्ष संजय पाटील, ज्येष्ठ रोटरी सदस्य चंद्रकांत लोढाया, डॉ प्रशांत सांगडे, संजय कोतकर, सारोळा केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाचोळे, पुंडलिक पाटील यासोबत ज्येष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी व सर्वं सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी जेष्ठ विधी तज्ज्ञ एस पी पाटील व विधी तज्ञ भाग्यश्री महाजन यांनी ज्येष्ठ नागरिक यांचे साठी शासनाच्या विविध योजना यावर सखोल मार्गदर्शन केले, डॉ मुकेश तेली यांनी ज्येष्ठ नागरिक हक्क व कर्तव्य यासोबत रोटरीच्या अनेक उपक्रम यासंदर्भात माहिती दिली. प्रा वैशाली बोरकर व प्रकाश विसपुते यांनी ज्येष्ठ नागरिक यांचे दैनंदिन जीवनामध्ये मध्ये हसा आणि आनंदी रहा यावर मार्गदर्शन केले. डॉ प्रशांत सांगडे यांनी सर्कल ऑफ केअर आणि पिअर काउनसेलिंग यावर सुंदर मार्गदर्शन केले. अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्ष डॉ अनिल देशमुख यांनी ग्राहकहक्क व अधिकार यावरती मार्गदर्शन केले.कार्यक्रमाची सुरुवात साने गुरुजी यांची खरा तो एकची धर्म या सामूहिक प्रार्थनेने झाली. ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष राजाराम सोनार काका यांनी संस्थे बद्दल उपस्थितांना माहिती दिली. सूत्रसंचालन शांताराम चौधरी सर यांनी केले तर आभार एम एस महाजन सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी पसायदान झाले.