पाचोरा (प्रा अमोल झेरवाल )
गेल्या काही दिवसात गहुले आणि वानेगाव या दोन्ही गावात पुरामुळे भरपूर नुकसान झाल्याने रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप केले गेले. यावेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव अध्यक्ष डॉ मुकेश तेली, डॉ अजयसिंग परदेशीं, चंद्रकांत लोढाया, भरत सिनकर, संजय कोतकर, डॉ किशोर पाटील,डॉ सिद्धांत तेली, मनोज केसवानी, वाणेगाव पोलीस पाटील नितीन जमदाडे, तंटामुक्त अध्यक्ष दिपक पाटील, ज्ञानेश्वर पाचोळे, लक्ष्मण जाधव, पुंडलिक पाटील, भावेश अहिरराव, महेश सोनवणे यासह गहुले पोलीस पाटील श्री. अनिल तडवी, दोन्ही गावातील तंटामुक्ती सदस्य, ग्रामस्थ, विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.यावेळी एकूण शंभर विद्यार्थ्याना वह्या ,पुस्तके,दप्तर, पाटी, पेन्सिल असे वाटप करण्यात आले. रोटरी अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी बोलताना सांगितले की रोटरी नेहमीच अश्या कठीण प्रसंगी पूरग्रस्त यांच्या मदतीला नेहमीच धावून येते व वेळोवेळी समाजपयोगी उपक्रम राबवत असते. यावेळी दोन्ही जि प शाळेतील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना रो मनोज केसवानी यांनी सायकल भेट देण्याचे सांगून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. नवनवीन दप्तर मिळाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडत होता.