केंद्र सरकारने मागील वर्षी १६ जानेवारी रोजी काढलेल्या अध्यादेशानुसार देशातील खाजगी कोचिंग क्लासेसवर कडक निर्बंध लावण्याचे आदेश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.केंद्र सरकारच्या या आदेशानुसार १६ वर्षाखालील विद्यार्थ्यांना खाजगी कोचिंग क्लासेस लावण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारने काढलेल्या या आदेशामुळे राज्यभरातील खाजगी कोचिंग क्लासेस चालक धास्तावले असुन,केंद्र सरकारच्या निर्णयामुळे कोचिंग क्लासेस चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
खाजगी शिकवणी संदर्भात केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशाची अमलबजावणी करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार नवीन खाजगी शैक्षणिक धोरण आणणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जाहीर केले आहे.
यासंदर्भात भाजपा कोचिंग क्लासेस असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.पांडुरंग मांडकीकर यांच्या नेतृत्वाखाली शालेय शिक्षण राज्यमंत्री यांच्या दालनात खाजगी कोचिंग क्लासेस नियमावली तयार करण्याची पुर्वतयारी बैठक मंत्रालय मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. नामदार पंकज भोयर यांनी शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेअंती राज्य सरकार खाजगी कोचिंग क्लासेस चालकांवर अन्याय होऊ देणार नाही,नवीन शैक्षणिक धोरण ठरवतांना खाजगी कोचिंग क्लासेस चालक व असोशिएशनला विचारत घेतले जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी भाजपा कोचिंग क्लासेस संचालक प्रकोष्ठ प्रदेशाध्यक्ष प्रा.डॉ.पांडुरंग मांडकीकर,प्रदेश उपाध्यक्ष mप्रा.इंद्रजित भोसले,प्रा.नितीन साळी, योगेश धनराळे, शालेय शिक्षण विभागाचे वरीष्ठ अधिकारीसहीत कोचिंग क्लासेस संचालक उपस्थित होते.
आपला विश्वासू
प्रा. योगेश आ. धनराळे
राज्य सल्लागार
भाजपा कोचिंग क्लासेस असोसिएशन