डॉक्टर डे निमित्त “सत्कार व विद्यार्थी उपयोगी मार्गदर्शन शिबिर” संपन्न
नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांची दमदार सुरुवात
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
आज दिनांक 3 जुलै रोजी डॉक्टर डे चे निमित्त साधत पाचोरा – भडगाव रोटरी क्लब तर्फे “सत्कार व विद्यार्थी उपयोगी मार्गदर्शन शिबिर” पार पडले. रोटरी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉक्टर मुकेश तेली व नवनिर्वाचित सचिव डॉक्टर अजयसिंग परदेशी यांनी पदभार सांभाळताच दमदार सुरुवात बघायला मिळाली.
पाचोरा शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमित साळुंके, वैद्यकीय अधीक्षक डॉ सतीश टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ विजय पाटील यांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांनी कोरोना काळापासून ते आज पावतो पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कामगिरीचा आदर म्हणून डॉक्टर डे निमित्त रोटरी क्लब तर्फे सत्कार व गुणगौरव करण्यात आला.
तसेच पाचोरा शहरातील कोंडवाडा गल्ली येथे असलेली जिल्हा परिषदेची कन्या शाळा येथे शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांवर मार्गदर्शन देण्यात आले.
शालेय विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक व दातांची काळजी आणि स्वछता या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी दातांची निगा या विषयावर डॉ अमोल जाधव, रोटरी क्लब विद्यमान अध्यक्ष डॉ मुकेश तेली यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन, लसीकरण आणि त्यांचे महत्व समजावून सांगितले.
रोटरी क्लब विद्यमान सचिव डॉ अजयसिंग परदेशी यांनी समतोल आहार आणि त्याचे महत्व यावर मार्गदर्शन केले. यासोबतच मुलांना केळे आणि खाऊ वाटप करण्यात आला.
या वेळी रोटरी क्लब पाचोरा भडगाव चे पदाधिकारी तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ मुकेश तेली, नवनिर्वाचित सचिव डॉ अजयसिंग परदेशी, डॉ सतीश टाक, डॉ अमित साळुंके, डॉ विजय पाटील, डॉ इम्रान शेख, डॉ घनश्याम चौधरी, डॉ गोरख महाजन, डॉ अमोल जाधव, डॉ बाळकृष्ण पाटील, डॉ पवन पाटील, चंद्रकांत लोढाया, निलेश कोटेचा, राजेश मोर, प्रदिप पाटील, डॉ पंकज शिंदे, डॉ शिवाजी शिंदे, प्रा अमोल झेरवाल, डॉ राहुल काटकर, डॉ किशोर पाटील तसेच नविन सदस्य डॉ कुणाल पाटील, डॉ प्रशांत सांगडे, डॉ सिद्धांत तेली, प्रज्ञेश खिलोशिया, संजय कोतकर, समवेत प्राध्यापक इंगळे सर, शाळेतील शिक्षक,शिक्षिका सोबत मुख्याध्यापिका हिवरे मॅडम, विद्यार्थी मित्र मैत्रिणी आणि पालक देखील आवर्जून हजर होते.