पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन – नवीन पदाधिकारी मंडळ २०२५-२६
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. १० सप्टेंबर २०२५ रोजी, बुधवार या दिवशी प्रतिष्ठित डॉक्टरांच्या उपस्थितीत पार पडली. या सभेला डॉ. अनिल झवर, डॉ. भरत पाटील बापू, डॉ. नरेश गवंडे , डॉ. पवनसिंग पाटील, डॉ. अजयसिंग परदेशी, डॉ. मुकेश राठोड, डॉ. अतुल पाटील, डॉ. दिनेश सोनार व डॉ. जाकीर देशमुख,डॉ.अमोल जाधव,डॉ.बाळकृष्ण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वांच्या संमतीने पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे नवीन पदाधिकारी मंडळ २०२५-२६ निवडण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे आहे :
चेयरमैन-डॉ.जीवन पाटील
• अध्यक्ष – डॉ. अजयसिंग परदेशी
• उपाध्यक्ष – डॉ. विजय जाधव
• सचिव – डॉ. राहुल काटकर
• सहसचिव – डॉ. राहुल झेरवाल
• खजिनदार – डॉ. राहुल पाटवारी
सभेला पाचोरातील अनेक मान्यवर डॉक्टर उपस्थित होते. त्यामध्ये डॉ. मुकेश तेली, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. राहुल पाटील, डॉ. ऋषिकेश चौधरी, डॉ. विशाल पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. विशाल पाटील (चिंतामणी हॉस्पिटल), डॉ. दीपक चौधरी, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. सचिन पाटील,डॉ. प्रविण देशमुख, डॉ. नंदकिशोर पिंगळे, डॉ. पृथ्वीराज, डॉ. यशवंत पाटील, डॉ. किशोर सोनवणे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. अनिल महाजन, डॉ.योगेश इंगळे, डॉ. संजय चौधरी, डॉ. संकेत विसपुते, डॉ. अभिषेक जगताप, डॉ. विकास केजरीवाल, डॉ. विरेंद्र पाटील,डॉ प्रमोद सोनवणे आदींचा समावेश होता.
नवीन पदाधिकारी मंडळ निवडून आल्यानंतर माजी अध्यक्ष डॉ. पवनसिंग पाटील यांनी मागील वर्षातील कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर डॉ. दिनेश सोनार, डॉ. अतुल पाटील व डॉ.अनिल झवर यांनीही आपल्या भावना व्यक्त करत असोसिएशनने केलेल्या उत्कृष्ट कामाची प्रशंसा केली.
नवीन अध्यक्ष डॉ. अजयसिंग परदेशी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आगामी काळात असोसिएशनमधील सर्व डॉक्टर बंधू-भगिनींच्या प्रगतीसाठी व पाचोरा-भडगाव तालुक्यातील जनतेच्या आरोग्यकल्याणासाठी निष्ठेने कार्य करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेवटी त्यांनी उपस्थित मान्यवर डॉक्टरांचे आभार मानले.
सभेच्या शेवटी सर्व डॉक्टरांनी नवीन पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.