होमिओपॅथिक डॉक्टर्सची जुनी मागणी मान्य.. पाचोर्यात आ. किशोर पाटील यांचा सत्कार
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
गेल्या १० वर्षांपासून प्रलंबित असलेली होमिओपॅथिक डॉक्टर्सची महत्त्वाची मागणी शासनाने मान्य केली आहे. सी. सी. एम. पी. हा कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टर्सचे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन करण्यावरील स्थगिती उठवून पुन्हा एकदा प्रक्रिया सुरू करण्याचा शासन आदेश नुकताच काढण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयानिमित्ताने होमिओपॅथिक पाचोरा व भडगाव तालुका असोसिएशनतर्फे आमदार किशोर पाटील यांचा सत्कार करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. सत्कारप्रसंगी पाचोरा तालुक्यातील होमिओपॅथिक डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्येड डॉक्टर दीपक पाटील, डॉक्टर नंदकिशोर पिंगळे, डॉक्टर भरत पाटील, डॉक्टर प्रमोद सोनवणे, डॉक्टर राहुल झेरवाल, डॉक्टर अभिषेक पाटील, डॉक्टर दीपक चौधरी, डॉक्टर राहुल तेली, डॉक्टर वीरपाल देशमुख सह पाचोरा व भडगाव तालुक्यातील इतर बी. एच. एम. एस. डॉक्टरांनी आमदार किशोर पाटील यांचे आभार मानले.
या निर्णयामुळे होमिओपॅथिक डॉक्टर्सना नवसंजीवनी लाभली असून वैद्यकीय क्षेत्रात त्यांच्या हक्काला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.