पाचोरा पंचायत समितीला लागले ग्रहण. भाग एक पाचोरा तालुक्यात घरकुल घोटाळा एकाच कुटुंबातील व्यक्तींना घरकुल मंजूर केले काहींनी घरकुल न बांधता लाटली अनुदानाची रक्कम ग्रामस्थांची तक्रार .
पाचोरा (नगराज पाटील )
पाचोरा : शासनाच्या लोक कल्याणकारी योजना नागरिकांना गरिबीतून वर काढण्याचे काम करतात मात्र खालची प्रशासनाची यंत्रणा त्या योजनांची कशी व्हिलेवाट लावते ते काही काम चुकार अधिकारी कर्मचारी यांच्या मनमानी पद्धतीने दिसून येते.नुकतेच कुरंगी येथील गोठा शेडचे अनुदान काढण्यासाठी एका पसमधील कंत्राटी कर्मचाऱ्याने अनुदान काढण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप एका लाभार्थ्यांनी केला होता त्या अनुषंगाने दैनिक लोकमतला बातमी येताच त्या पैशाने झपाटलेला कंत्राटी कर्मचारीने त्याच दिवशी कुरंगी गाठून तेथील तक्रारदार लाभार्थ्याकडे जाऊन माझी नोकरी जाईल या भीतीपोटी हात जोडणी करून लेखी तक्रार घेतली मला पैसेच दिले नसल्याचा पुरावा गटविकास अधिकाऱ्यांकडे दिल्याचा केविलवाणा प्रकार केल्याचे समजते. ते संपत नाही तोच तालुक्यातील डांभुर्णी येथील घरकुल घोटाळा झाला असल्याची तक्रार पाचोरा पंचायत समितीकडे ग्रामस्थांनी केली आहे .दुसरीकडे तालुक्यात काही गावातील शौचालय अनुदान वाटल्याचेही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे या समस्या पाहून पाचोरा पंचायत समितीला जणू काही ग्रहणच लागले असल्याचे दिसून येत आहे मागील पंधरा दिवसांपूर्वी आमदार किशोर पाटील यांनी आढावा बैठकीत पाचोरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना केलेल्या चुकांवर चांगलेच धारेवर धरले होते त्यानंतर पुन्हा गोठा शेड अनुदान काढण्यासाठी लाभार्थ्यांकडून घेतलेले पैसे त्यानंतर तालुक्यात झालेल्या शौचालय अनुदान घोटाळा व आता डांभुर्णी येथील घरकुल घोटाळा झाल्या असल्याची तक्रार पाचोरा पंचायत समितीकडे देण्यात आली आहे. तक्रारदार पदमसिंह किसन परदेशी यांनी केलेल्या तक्रारीत डांभुर्णी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सुमारे 90 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ सन 2020 ते 2025 या कालावधीत देण्यात आला आहे घरकुल साठी पात्र लाभार्थ्यांना लाभ देताना त्यांचे घरकुल मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवताना गावातील विद्यमान सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक अशांनी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना स्वतःच्या आर्थिक राजकीय फायद्यासाठी स्वतःच्या जवळच्या लोकांना बेकायदेशीर रित्या पात्र नसतानाही खोटे बनावट ठरावाचे कागदपत्र तयार करून माहिती सादर करून शासनाची दिशाभूल करून संगणमत कट कारस्थान रचून शासनाची फसवणूक केली आहे ज्या लाभार्थ्यांकडे पक्के रहिवासी घर आहे त्यांना घरकुलाचा लाभ दिला एकाच घरातील दोन तीन लाभार्थ्यांना घरकुल योजनेत समाविष्ट करून त्यांनाही लाभ दिला एकाच कुटुंबातील एकत्र रहिवास असलेल्यांना दोन-तीन कुटुंब सदस्यांना लाभ दिला गावात स्वतःची घर जागा नमुना नंबर आठला असताना देखील लाभार्थ्यांनी शेतात घरकुल बांधले आहे एकाच कुटुंबातील दोन तीन सदस्यांनी घरकुलाचा लाभ देताना एकच घरकुल बांधले बाकी घरकुलाचे घर न बांधता अनुदान लाटले काही घरकुल लाभार्थ्यांनी घरकुलाचे अनुदान काढून घेतले मात्र प्रत्यक्ष घरकुल बांधकाम केलेच नाही असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक रोजगार सेवक यांनी संगनमताने कटकारस्थान रचून खोटी माहितीचे कागदपत्रे बनवून खोटे ठराव पूर्णत्वाचे दाखले देऊन पात्र नसलेल्यांना घरकुलाचा लाभ देऊन शासनाची संगणमताने दिशाभूल करून फसवणूक केलेले असल्या ने त्यांच्यावर तातडीने चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दिनांक 13 मे रोजी आम्ही ग्रामस्थांनी पाचोरा गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी घरकुल घोटाळ्याची तक्रार केलेली असून त्या तक्रारीवर आतापर्यंत कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही शासनाच्या डोळ्यात सरपंच ग्रामसेवक आदींनी धुळफेकरून दिशाभूल केली आहे.
संतोष फुलचंद परदेशी ग्रामस्थ डांभुर्णी.