
पिंपळगाव (हरे.) | प्रा अमोल झेरवाल
ग्रामविकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय येथे इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य बी. आर. महाजन प्रा. जी एस देशमुख उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंडळाचे चिटणीस एस. व्ही. गीते होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य प्रा.पी. ओ. चौधरी यांनी केले.
प्राचार्य पी. जे. तेली यांनी दहावी व बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यांनी परीक्षा मार्गदर्शक सूचना, कॉपीमुक्त अभियानाची माहिती तसेच अभ्यास नियोजनाबाबत विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना दिल्या. तसेच विद्यालयाचे पर्यवेक्षक पी आर देशमुख यांनी देखील आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या मनोगतांमध्ये काव्या पाटील, अपेक्षा भंडारे, मोहित पाटील, नंदिनी पाटील, नंदिनी परदेशी व कुमारी बडगुजर यांनी आपल्या शालेय आठवणी व्यक्त करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुणे बी. आर. महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ध्येय, नम्रता आणि आत्मविश्वास या गुणांचा अंगीकार आवश्यक आहे.” अध्यक्षीय भाषणात एस. व्ही. गीते यांनी परिश्रम, ध्येय निश्चिती व सातत्यपूर्ण कष्ट हे यशाचे मुख्य सूत्र असल्याचे अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनोज सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश भडांगे यांनी केले. यावेळी ग्रामविकास मंडळाचे संचालक कडूबा तेली, प्रदीप बडगुजर, विद्यालयाचे परीक्षक पी आर. देशमुख, पी. ए. जाधव तसेच माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत भावनिक निरोप देण्यात आला.












