पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
ग्रामविकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय येथे भगवान विश्वकर्मा महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी भगवान विश्वकर्मा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे शुभ हस्ते प्राचार्य पी. जे. तेली यांनी पूजन करून जयंती सोहळ्याची सुरुवात केली. यावेळी विद्यार्थ्यांना विश्वकर्मा महाराजांचे कार्य, श्रमसंस्कृतीचे महत्त्व तसेच कौशल्य, उद्योग आणि सर्जनशीलतेचे मूल्य यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला उपमुख्याध्यापक प्रा. पी. ओ. चौधरी, मनोज बडगुजर, सुतार सर, राजू दादा सपकाळ तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
विद्यालयात आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये परंपरेबद्दल आदर, कौशल्याची जाणीव आणि श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व अधोरेखित झाले. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.












