पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
पाचोरा नगरपरिषदेमध्ये स्थायी समिती तसेच विविध विषय समित्यांचे सदस्य नामनिर्देशन व समिती सभापतींची निवड करण्यासाठी आज दि. १९/०१/२०२६ रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांचेकडील विशेष सभेच्या सूचना जा.क्रं./नपा/संकलन९/सा निवडणूक/२९२/२०२६, दिनांक १४/०१/२०२६ अन्वये ही सभा घेण्यात आली. या सभेत नगरपरिषदेमधील विविध विषय समित्यांमध्ये सभापतींसह सदस्यांची निवड करण्यात आली.
विशेष सभेत पुढीलप्रमाणे समित्यांची रचना निश्चित करण्यात आली—
(१) सार्वजनिक बांधकाम समिती
सभापती: प्रियंका वाल्मिक पाटील
सदस्य: सुमित किशोर पाटील, संदीप रामदास पाटील, रफिक गफ्फार बागवान, प्रांजल सुमित सावंत, जयश्री अमृतराव भोसले, सुरज संजय वाघ
(२) शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती
सभापती: प्रविण हरिश्चंद्र ब्राम्हणे
सदस्य: प्रदीप भगवान वाघ, खनसा सलीम बागवान, योगेश जगन्नाथ पाटील, संजय त्र्यंबक चौधरी, दिपाली किशोर पाटील, अमरीन अ. रेहमान देशमुख
(३) स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती
सभापती: सतीष पुंडलिक चेडे
सदस्य: संदीप रामदास पाटील, मनिषा सुचेंद्र बाविस्कर, जयश्री अमृतराव भोसले, प्रदीप भगवान वाघ, वर्षा प्रविण ब्राम्हणे, गोपालदास लक्ष्मणदास वासवानी
(४) पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समिती
सभापती: रहेमान बिस्मिल्ला तडवी
सदस्य: प्रांजल सुमित सावंत, सुमित किशोर पाटील, सुरेखा अशोक पाटील, संजय त्र्यंबक चौधरी, खनसा सलीम बागवान, कविता उमेश हटकर
(५) नियोजन आणि विकास समिती
सभापती: किशोर गुणवंत बारवकर
सदस्य: शरद बाळकृष्ण पाटे, रफिक गफ्फार बागवान, रशिदाबी शब्बीर शेख, वैशाली छोटूलाल चौधरी, वर्षा प्रविण ब्राम्हणे, अविनाश देविदास सुतार
(६) महिला व बालकल्याण समिती
सभापती: मिनाक्षी संजय एरंडे
सदस्य: मनिषा सुचेंद्र बाविस्कर, दिपाली किशोर पाटील, सुरेखा अशोक पाटील, वैशाली छोटूलाल चौधरी, रशिदाबी शब्बीर शेख, कविता विनोद पाटील
दरम्यान, स्थायी समितीमध्ये नगराध्यक्षा, सर्व विषय समित्यांचे सभापती तसेच पालिका सदस्यांनी नामनिर्देशीत केलेले तीन सदस्य यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये—
(१) श्री. गणेश भीमराव पाटील
(२) श्री. संजय नाथालाल गोहिल
(३) श्री. राहुल अंकुश गायकवाड
यांचा समावेश करण्यात आला आहे.
या विशेष सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून भूषण अहिरे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा विभाग, यांनी कामकाज पाहिले. सदर सभेसाठी लोकनियुक्त नगराध्यक्षा सुनिता किशोर पाटील, उपाध्यक्ष किशोर गुणवंत बारवकर, सर्व नगरपरिषद सदस्य/सदस्या तसेच मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष सभेत विषय समित्यांची रचना पूर्ण झाल्याने नगरपरिषदेमधील विकासकामे, स्वच्छता, पाणीपुरवठा, शिक्षण-क्रीडा तसेच महिला व बालकल्याण विषयक कामांना अधिक गती मिळणार असल्याचे मत उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आले.











