एक विचार, एक ध्यास, समाजविकासाचा प्रवास; पद्मवंशीय तेली समाजाची नवी कार्यकारिणी
पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या कार्यकारिणीची धुरा; संजय सुकलाल झेरवाल सर यांची अध्यक्षपदी निवड
पिंपळगाव हरेश्वर येथील पद्मवंशीय तेली समाज विकास मंडळाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. समाजाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देणे, समाजातील विविध घटकांना एकत्र आणणे तसेच शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रात समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने या कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी श्री. संजय सुकलाल झेरवाल सर, तर सचिवपदी डॉ. सुरेश गेंदिलाल नैनाव यांची निवड करण्यात आली. सहसचिवपदी श्री. रघुनाथ राधाकिसन ढाकरे, उपाध्यक्षपदी श्री. सुदाम हिराचंद उदणे, तर सहउपाध्यक्षपदी श्री. राहुल भिका नैनाव यांची निवड झाली आहे.
तसेच कोषाध्यक्षपदी श्री. रामदास शेनफडू चौधरी आणि सहकोषाध्यक्षपदी श्री. ज्ञानेश्वर त्रंबक पंचोळे यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. समाजातील युवकांना संघटित करून त्यांच्यामध्ये सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजसेवेची भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने युवाध्यक्षपदी श्री. पवन संजय सरताळे, तर सहयुवाध्यक्षपदी श्री. शंकर प्रकाश मंडावरे यांची निवड करण्यात आली.
वरिष्ठ सल्लागार समितीची निवड
समाजाच्या अनुभवी व ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाचा लाभ नूतन कार्यकारिणीला मिळावा यासाठी वरिष्ठ सल्लागार समितीचीही निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये श्री. कांतीलाल नारायण ढाकरे, श्री. पांडुरंग गोविंदा नैनाव, डॉ. चंद्रकांत रामदास नैनाव आणि श्री. मिश्रीलाल सुकलाल झेरवाल यांचा समावेश करण्यात आला आहे.
कार्यकारिणी सदस्य
नूतन कार्यकारिणीच्या सदस्यपदी श्री. ज्ञानेश्वर मोतीलाल ढाकरे, श्री. मिश्रीलाल बन्सी ढाकरे, श्री. दीपक विठ्ठल झेरवाल, श्री. अमोल नामदेव माहुरे, श्री. चंद्रकांत काशिनाथ माहुरे, श्री. रमेश भावलाल आगवाल, श्री. किरण कैलास माहुरे, श्री. देवानंद प्रकाश नैनाव, श्री. अनिल भावलाल ढाकरे, श्री. संदीप उत्तम तेली आणि श्री. शुभम कैलास झेरवाल यांची निवड करण्यात आली आहे.
शैक्षणिक, सामाजिक व युवक विकासावर भर
नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून समाजातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन, युवकांसाठी विविध उपक्रम, महिलांसाठी सामाजिक व शैक्षणिक उपक्रम तसेच समाजातील गरजू कुटुंबांना आवश्यक ते सहकार्य करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
समाजातील तरुण पिढीला शिक्षण, रोजगार, व्यवसाय व स्पर्धात्मक क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणे, समाजातील विविध कुटुंबांमध्ये परस्पर संवाद व एकोपा वाढविणे आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी विविध उपक्रम राबविणे, यासाठी नूतन कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे.
एकजुटीतून समाजाच्या प्रगतीचा संकल्प
पद्मवंशीय तेली समाजाच्या विकासासाठी “संघटन, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी” या त्रिसूत्रीच्या माध्यमातून काम करण्याचा संकल्प नूतन कार्यकारिणीने व्यक्त केला आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन पारदर्शक पद्धतीने कार्य करणे आणि पुढील पिढीसाठी अधिक सक्षम सामाजिक वातावरण निर्माण करणे, हे नूतन कार्यकारिणीसमोरील महत्त्वाचे उद्दिष्ट राहणार आहे.
नूतन कार्यकारिणीच्या निवडीबद्दल समाजबांधवांकडून पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपळगाव हरेश्वर येथील पद्मवंशीय तेली समाजाच्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.










