पाचोरा, दि. ५ (प्रतिनिधी)
पाचोरा येथील रहिवासी श्री. महेंद्र गणपतराव महाडीक (पाटील) (मोंढाळाकर) यांचे वडील कै. गणपतराव सुपडू महाडीक यांचे रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी रात्री ८.०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने महाडीक परिवारासह मोंढाळा, पळसखेडे व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कै. गणपतराव महाडीक यांचे मूळ गाव पळसखेडे असून त्यांचा दीर्घकाळ मोंढाळा येथे वास्तव्यास होता. त्यांनी आपल्या शांत, मनमिळावू आणि साध्या स्वभावामुळे समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांनी महाडीक कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता मोरया कन्स्ट्रक्शन, कृष्णदर्शन सोसायटी शेजारी, राजीव गांधी नगर, पाचोरा येथील निवासस्थानावरून निघणार असून पाचोरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे.
शोकाकुल : महाडीक परिवार, मोंढाळा, शिरसोली व पळसखेडे.











