पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या शेतपाणंद रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शुक्रवार, दि. ०१ मे २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता पार पडणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा, पहाण (ता. पाचोरा, जि. जळगाव) येथे आयोजित करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना अंतर्गत या महत्त्वपूर्ण कामाचा शुभारंभ होत असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर पाटील हे राहणार आहेत.
या प्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार, जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, बांधकाम विभागाचे उपअभियंता सतीश शिसोदे, माजी जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंग पाटील, सुनील पाटील, रविंद्र गीते तसेच मनोज राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
सदर शेतपाणंद रस्ता पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः शेतीमालाची वाहतूक सुलभ होणार असून, दळणवळणाच्या सुविधांमध्ये लक्षणीय सुधारणा होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च यामध्ये बचत होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










