पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
खडकदेवळा (ता. पाचोरा) येथे नववर्षाच्या शुभमुहूर्तावर १ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक निरंकारी सत्संगाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. निरंकारी सद्गुरू माता सुदिक्षा जी महाराज यांच्या असीम कृपेने होणारा हा अकरावा वार्षिक निरंकारी सत्संग असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
या सत्संगासाठी मार्गदर्शन करण्याकरिता केंद्रीय ज्ञान प्रचारक निर्मल कुमार सोनी जी (कुल्लू–मनाली, हिमाचल प्रदेश) हे विशेष उपस्थित राहणार आहेत. सत्संगाचे मार्गदर्शन सायंकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमानिमित्त दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन खडक देवळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे. सत्संगाच्या समाप्तीनंतर ज्ञानदानाचा कार्यक्रम देखील होणार आहे.
या आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त भाविकांनी घ्यावा, असे आवाहन झोनल प्रमुख हिरालालजी पाटील, तालुका संयोजक महेशजी वाघ तसेच खडक देवळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.











