जळगाव | प्रा अमोल झेरवाल
जळगाव शहरात आयुर्वेदाच्या शास्त्रशुद्ध, आधुनिक आणि परिणामकारक उपचारपद्धतीद्वारे रुग्णसेवेत विश्वासार्ह नाव निर्माण करणाऱ्या दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर, जळगाव येथील वैद्य योगेश तेली यांना त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जळगाव जिल्ह्यातील उत्कृष्ट युवा आयुर्वेद वैद्य – युवा उपलब्धी पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार श्री धूतपापेश्वर लिमिटेड यांच्या वतीने प्रदान करण्यात आला.
आयुर्वेद ही हजारो वर्षांची समृद्ध वैद्यकीय परंपरा असून आजच्या धकाधकीच्या व तणावपूर्ण जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या विविध आजारांवर आयुर्वेद प्रभावी, सुरक्षित आणि दीर्घकालीन उपाय देतो. वैद्य योगेश तेली यांनी आयुर्वेद शास्त्राचा शास्त्रशुद्ध वापर करत पंचकर्म थेरपी, रुग्णाच्या वैयक्तिक प्रकृतीनुसार उपचार, योग्य आहार-विहार मार्गदर्शन तसेच सातत्यपूर्ण फॉलोअप यांद्वारे अनेक रुग्णांना उत्तम आरोग्यलाभ मिळवून दिला आहे.
दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल येथे पचनसंस्थेचे विकार, स्त्रीरोग, त्वचारोग, सांधेदुखी, ताणतणाव व जीवनशैलीजन्य आजार यांसह विविध आजारांवर उपचार केले जातात. तसेच पंचकर्म उपचारांद्वारे संपूर्ण आरोग्य संवर्धनावर विशेष भर दिला जातो. यामुळे केवळ जळगाव शहरातच नव्हे तर जिल्हा व परिसरातील अनेक रुग्णांचा या हॉस्पिटलवर मोठा विश्वास निर्माण झाला आहे.
या पुरस्कारामागे वैद्य योगेश तेली यांची निष्ठावान सेवा, प्रामाणिक प्रयत्न आणि रुग्णांनी दाखवलेला विश्वास हेच खरे बळ ठरले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना वैद्य योगेश तेली यांनी सांगितले की, “हा सन्मान मला भविष्यात समाजासाठी आयुर्वेद सेवा अधिक व्यापक, गुणवत्तापूर्ण आणि समर्पणाने करण्याची प्रेरणा देणारा आहे.”
या यशाबद्दल वैद्य योगेश तेली यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून आयुर्वेदाच्या माध्यमातून समाजाच्या आरोग्यसेवेत त्यांचे योगदान अधिक व्यापक होवो, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
हॉस्पिटल पत्ता :
दीर्घायु सुपरस्पेशालिटी आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म सेंटर,
श्री स्वामी समर्थ केंद्राजवळ, प्रताप नगर, जळगाव.
मो. : ९८६०४८७१९८











