आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पाचोरा येथे भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन; प्रथम बक्षीस 11,000
पाचोरा: (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था, पाचोरा आणि द युनिक अकॅडमी, शाखा जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत व खुली भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
ही स्पर्धा रविवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता पाचोरा येथील व्यापारी भवन, कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. बक्षिसांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
* प्रथम बक्षीस: ₹11,000
* द्वितीय बक्षीस: ₹7,100
* तृतीय बक्षीस: ₹5,100
* चतुर्थ बक्षीस: ₹3,100
* पाचवे बक्षीस: ₹1,100
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. इच्छूक विद्यार्थी खालील लिंकवर क्लिक करून आपली नोंदणी करू शकतात:
नोंदणीसाठी गुगल फॉर्म: https://forms.gle/V9iZm4MJ8mNSqMq97
नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: ८९२९७२८४१८
महत्त्वाच्या सूचना:
* स्पर्धेसाठी येताना विद्यार्थ्यांनी सोबत पॅड, पेन व कोरे (Blank) पृष्ठ आणणे आवश्यक आहे.
या भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी व जिज्ञासूंनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











