पाचोरा
(प्रा अमोल झेरवाल)
खडकदेवळा येथील उद्योजकशील व्यावसायिक, कृषितज्ज्ञ व लेखणीचे शिलेदार तथा पोलीस पाटील तुकाराम तेली यांचा आगळा वेगळा उपक्रम…
तुकाराम धोंडू तेली यांचा मुलगा फेमस youtuber जगदीश याचा विवाह श्रीरामपूर येथील शांतीलाल सुपडू मावरे यांची मुलगी प्रांजल हिच्याशी होणार आहे. त्या अनुषंगाने तुकाराम तेली यांनी 1000 पत्रिका छापण्याचा निर्णय घेतला. या पत्रिका संपूर्ण समाज तथा मित्र मंडळी यांना दिल्या जाणार असल्याने यात मुलाच्या लग्नाच्या आमंत्रणा सोबत काही समाज उपयोगी संदेश पाठविण्याचा निर्णय तेली यांनी घेतला. या त्यांच्या युक्तीने त्यांनी लग्न पत्रिकेत काही महत्त्वाचे वाक्य टाकून समाजाचे लक्ष वेधले.
त्यांनी लग्न पत्रिकेत खालील काही वाक्य टाकत समाजाला सूचना केल्या आहेत
*अवयव दान करा रक्तदान करा*
*मुलगी वाचवा मुलगी शिकवा*
*पाणी जपून वापरा झाडे लावा झाडे जगवा*
*सर्व मनुष्य एका परमेश्वराची लेकर आहेत जातीय भेद करू नका*
*एक ज्योती है सबके अंदर नर हे चाहे नारी है शूद्र वैश्य ब्राह्मण क्षत्रिय प्रभू की रचना सारी है*
या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा होत आहे व या लढवलेल्या शक्कल चे सर्वत्र कौतुक होत आहे.