पिंपळगाव हरे. | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास विद्यालय, पिंपळगाव (हरे) ता. पाचोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी “जय भीम”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यानंतर आयोजित कार्यक्रमात प्राचार्य पी. जे. तेली, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख, पी. ए. जाधव तसेच शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
डॉ. आंबेडकर यांचे जीवनकार्य अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी समाजातील विषमता, अस्पृश्यता व अन्यायाविरुद्ध लढा उभारला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांनी देशाला लोकशाहीची भक्कम पायाभरणी करून दिली. समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही मूल्ये त्यांनी समाजात रुजवली.
तसेच शिक्षणाला त्यांनी सर्वात मोठे शस्त्र मानले असून “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजही प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरत आहे. महिलांचे हक्क, कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे..
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे आचरण करण्याचा व समाजात समानतेची भावना रुजविण्याचा संकल्प केला.










