पाचोरा | प्रा. अमोल झेरवाल
ग्राम विकास मंडळ, पिंपळगाव (हरे) ता. पाचोरा जि. जळगाव संचालित ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय च्या नव्या इमारतीच्या बांधकामासाठी भव्य भूमिपूजन समारंभ उद्या, दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा कै. हरिभाऊ गोविंदराव देशमुख सभागृह, पिंपळगाव (हरे) येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचे शुभहस्ते महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील हे राहणार आहेत.
यावेळी विशेष अतिथी म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. स्मिता वाघ, प्रमुख अतिथी म्हणून आमदार मा. दिलीप वाघ, तसेच युवा नेते मा. अमोल शिंदे यांची उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती राहणार असून त्यामध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ग्राम विकास मंडळाचे पदाधिकारी तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष तयारी केली आहे.
ग्राम विकास मंडळ संचालित सर्व शाखांतील मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचाही कार्यक्रमात सहभाग राहणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महत्वपूर्ण सोहळ्यास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.










