
पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
गटसंसाधन केंद्र, शिक्षण विभाग पंचायत समिती पाचोरा यांच्या वतीने दिव्यांग समावेशक शिक्षण अंतर्गत विशेष शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शुक्रवार, दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 8 वाजता पाचोरा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल येथे या प्रशिक्षणाचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. सदर प्रशिक्षण दोन दिवस असणार आहे.
या कार्यक्रमास गटशिक्षणाधिकारी विजय पवार प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून दिव्यांग विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय पवार, विस्ताराधिकारी समाधान पाटील व सरोज गायकवाड, गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य प्रेम शामनानी, तसेच सर्व केंद्रप्रमुख व विशेष शिक्षक कैलास बडगुजर, सीमा पाटील, जयदीप पाटील, दिलीप पाटील, प्रकाश पाटील, घनश्याम चौधरी, रावसाहेब साळुंखे, लहू पवार, शरद पाटील, सुनिता पाटील, आराध्ये मॅडम, सुवर्णा पाटील, सोनाली शेवरे, देसले मॅडम उपस्थित होते.
या प्रशिक्षणात विविध केंद्रांमधून शिक्षक-शिक्षिका प्रतिनिधींनी सहभाग घेतला. सुभाष माळी व प्रशांत सोनवणे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन करत दिव्यांगांचे प्रकार, त्यांच्यासाठी प्रभावी शैक्षणिक पद्धती तसेच आधुनिक ॲप्लिकेशन्सच्या वापराबाबत सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली शेवरे यांनी केले, तर प्रास्ताविक सीमा पाटील मॅडम यांनी मांडले. शेवटी लहू पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
हा उपक्रम दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शिक्षणात समावेशकता वाढविण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.










