पिंपळगाव हरेश्र्वर | नरेंद्र देशमुख
ग्राम विकास मंडळ पिंपळगाव (हरे) चे संस्थापक चिटणीस कै. आप्पासो मोरेश्वर हरी देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील यांच्या शुभहस्ते कै. आप्पासो मोरेश्वर हरी देशपांडे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रा. राम पाटील यांनी कै. मोरेश्वर हरी देशपांडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा, समाजसेवेचा व दातृत्वाचा सविस्तर परिचय करून दिला. ग्रामीण भागातील शिक्षणविकासासाठी त्यांनी दिलेले योगदान, त्यांची दूरदृष्टी व सेवाभावी वृत्ती यामुळेच ग्राम विकास मंडळाची भक्कम पायाभरणी झाली, असे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी ग्राम विकास मंडळाचे संचालक अशोक कृष्णराव पाटील, रंगलाल राठोड, जनार्दन देव, ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. ए. जाधव, ग्राम विकास मंडळाचे लिपिक राजू दादा सपकाळ यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते.
कार्यक्रम शांत व सन्मानपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थापकांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.












