पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
पाचोरा-भडगाव तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य संवर्धनासाठी रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने संपूर्ण तालुक्यात थेलेसेमिया तपासणी अभियानाचा श्रीगणेशा करण्यात आला. या उपक्रमाची सुरुवात लोहटार येथील एम. एम. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपासून करण्यात आली.
रोटरी क्लब पाचोरा-भडगाव व एम. एम. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात थेलेसेमिया आजाराबाबत सविस्तर जनजागृती करण्यात आली. या शिबिरात एकूण ६१ विद्यार्थ्यांची थेलेसेमिया तपासणीसाठी रक्त तपासणी करण्यात आली. यासोबतच लोहटार गावातील सुमारे ३०० नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कार्यक्रमात रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी थेलेसेमिया हा आनुवंशिक आजार असून त्याची वेळेवर तपासणी व जनजागृती अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच सेंद्रिय शेतीचे महत्त्व व त्याचे आरोग्यावर होणारे सकारात्मक परिणाम याविषयी मयूर वाघ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या शिबिरासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, रोटरी सदस्य व उपप्रांतपाल भरत सिनकर, डॉ. सिद्धांत तेली, संजय कोतकर, डॉ. अभिषेक जगताप, महालॅब्सचे शुभम पाटील व लक्ष्मण जाधव तसेच ओम हॉस्पिटलचा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
तसेच एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, प्रा. स्वप्निल भोसले, डॉ. कीर्ती सोनवणे, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. सागर पाटील, प्रा. सागर पाटील, डॉ. सुवर्णा पाटील, प्रा. अक्षय तडवी, प्रा. अक्षय शेंडे यांच्यासह गावातील स्त्री-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या या उपक्रमामुळे थेलेसेमिया आजाराबाबत जनजागृती होऊन भविष्यातील पिढी अधिक निरोगी राहण्यासाठी निश्चितच मोलाची मदत होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.











