पिंपळगाव (हरे.) | प्रा अमोल झेरवाल
ग्राम विकास कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव (हरे.) येथे इयत्ता १२ वी (HSC-2026) परीक्षेचा निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत महाविद्यालयाचा लौकिक उंचावला आहे. विशेष म्हणजे, यावर्षी परीक्षा सीसीटीव्हीच्या कडक निगराणीत व पूर्णतः कॉपीमुक्त वातावरणात पार पडूनही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे.
महाविद्यालयाचा एकूण सरासरी निकाल 71.94% लागला असून विज्ञान शाखेने 91.01% इतका भक्कम निकाल नोंदवत आघाडी घेतली आहे. तर कला शाखेचा निकाल 28.81% लागला आहे.
विज्ञान शाखेत नकुल भागीरथ ढाकरे (81.33%) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. खुशाल विजय माहोर (75.33%) द्वितीय, तर आर्यन आनंद पाटील (65.33%) तृतीय क्रमांकावर राहिले.
कला शाखेत माधुरी मनोज पवार (60%) प्रथम, रेश्मा अखिल तडवी (58.17%) द्वितीय, तर कीर्ती कैलास पवार (58%) यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
या उल्लेखनीय यशाबद्दल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गीते, सर्व संचालक मंडळ, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य पी. जे. तेली, उपप्राचार्य प्रा. पी. ओ. चौधरी, पर्यवेक्षक पी. आर. देशमुख व पी. ए. जाधव, सर्व प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.
कडक शिस्त, कॉपीमुक्त परीक्षा पद्धती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक परिश्रमाला यश मिळाल्याचे चित्र दिसून आले. या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालयाने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे.










