रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे गर्भाशय कॅन्सर लसीकरण मार्गदर्शन आणि इन्टेरेक्ट क्लबचे सर्टिफिकेट प्रदान
पाचोरा-भडगाव: (प्रा अमोल झेरवाल)
रोटरी क्लब पाचोरा भडगाव यांच्या वतीने जागतिक इन्टेरेक्ट आठवडा ३ नोव्हेंबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने येथील शिंदे इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘गर्भाशय कॅन्सर माहिती आणि HPV लसीकरण’ या विषयावर एक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
आरोग्य आणि शिक्षण मार्गदर्शन
* बालरोगतज्ञ डॉ. राहुल काटकर यांनी शाळेतील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना गर्भाशय कॅन्सर आणि ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) लसीकरणाचे महत्त्व याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
* रोटरी क्लब पाचोरा भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांनी यावेळी बोलताना रोटरी क्लबचे समाजासाठी असलेले बहुमोल योगदान स्पष्ट केले.
* रोटरी सदस्य डॉ. प्रशांत सांगडे यांनी येणाऱ्या रविवारी रोटरी क्लबने आयोजित केलेल्या पारंपरिक खेळ महोत्सव याविषयी माहिती दिली.
इंटरॅक्ट क्लबचे सर्टिफिकेट प्रदान
या कार्यक्रमादरम्यान रोटरी इंटरनॅशनल कडून शाळेला प्राप्त झालेले इन्टेरेक्ट क्लबचे सर्टिफिकेट भेट देण्यात आले. तसेच, ज्या विद्यार्थ्यांनी इंटरॅक्ट क्लबचे सदस्यत्व घेतले, त्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
यावेळी गिरनाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तात्यासाहेब पंडितराव शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, रोटरी सदस्य डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. कुणाल पाटील, डॉ. राहुल काटकर, डॉ. सिद्धांत तेली, संजय कोतकर, ज्ञानेश्वर पाचोळे सर, सिरम इन्स्टिट्यूटचे हितेश पांडे, नीरज सोनजे सर, चिंतामण पाटील, रोट्रॅक्ट क्लबचे मानव सालोमन, पुंडलिक पाटील, लक्ष्मण जाधव, चेतन सरोदे आणि शाळेचे प्राचार्य डॉ. विजय पाटील सर उपस्थित होते.











