पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
डॉ. विजय जाधव अध्यक्ष, तर डॉ. स्वप्निल पाटील व डॉ. राहुल काटकर उपाध्यक्ष; नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन
पाचोरा : पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या (PDA) सन २०२६-२७ या वर्षासाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देत सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमांना अधिक बळ देण्याच्या उद्देशाने नव्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नूतन कार्यकारिणीत डॉ. नरेश गवांदे यांची चेअरमनपदी, डॉ. विजय जाधव यांची अध्यक्षपदी, तर डॉ. स्वप्निल पाटील आणि डॉ. राहुल काटकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय डॉ. विशाल पाटील यांची सचिवपदी, डॉ. सचिन पाटील यांची सहसचिवपदी, डॉ. ऋषिकेश चौधरी यांची खजिनदारपदी, तर डॉ. पृथ्वीराज राजपूत यांची प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनच्या माध्यमातून शहर व परिसरातील नागरिकांसाठी विविध आरोग्यविषयक जनजागृती उपक्रम, वैद्यकीय मार्गदर्शन, आरोग्य तपासणी शिबिरे तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. नूतन कार्यकारिणीच्या माध्यमातून या उपक्रमांना आणखी व्यापक स्वरूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील बदलती आव्हाने, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि डॉक्टरांमध्ये समन्वय वाढविणे यासाठी नूतन पदाधिकारी कार्यरत राहणार आहेत. तसेच पाचोरा-भडगाव परिसरातील आरोग्यसेवेला अधिक सक्षम करण्यासाठी असोसिएशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सन २०२६-२७ साठी निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे पाचोरा-भडगाव परिसरातील डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी तसेच PDA मित्र परिवाराकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.










