पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
किशोर आप्पा पाटील बहुउद्देशीय संस्था संचलित नर्मदा इंटरनॅशनल स्कूल (सी.बी.एस.ई. प्रस्तावित), पाचोरा यांच्या वतीने ‘ज्ञानोत्सव 2026’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शैक्षणिक गुणवत्तेला चालना देत विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व सर्वसमावेशक शिक्षणाची दारे खुली करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. भाऊसाहेब चौधरी भूषविणार असून, प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. गणेश शिंदे उपस्थित राहणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. संजय पाटील (मुंबई) यांची उपस्थिती लाभणार आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
‘ज्ञानोत्सव 2026’ अंतर्गत इयत्ता नर्सरी ते ७ वी पर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आधुनिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शैक्षणिक रचना हे या संस्थेचे वैशिष्ट्य आहे.
शाळेमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम, कृतीआधारित शिक्षण, स्मार्ट डिजिटल वर्ग, प्रशिक्षित व प्रेरणादायी शिक्षक, सुसज्ज प्रयोगशाळा, अत्याधुनिक संगणक लॅब, समृद्ध ग्रंथालय, क्रीडा व सहशालेय उपक्रमांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा तसेच स्वच्छ व सुरक्षित वातावरणाची विशेष काळजी घेतली जाणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दि. २२ मार्च २०२६ रोजी सायं. ५.०० वाजता करण्यात आले असून, कार्यक्रमाचे ठिकाण अंतुर्ली फाटा जवळ, भडगाव रोड, पाचोरा, जि. जळगाव असे आहे.
प्रवेशासाठी मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पालकांनी त्वरित अर्ज करण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9044183111 / 9044184111 या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.










