पाचोरा| प्रा अमोल झेरवाल
जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब पाचोरा भडगाव व अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने जागृती शाळेतील विद्यार्थी–विद्यार्थिनींसाठी थेलेसेमिया तपासणी व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विद्यार्थ्यांची मोफत रक्ततपासणी करण्यात येऊन थेलेसेमिया या आनुवंशिक रक्तविकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने झाली. त्यांनी थेलेसेमिया आजाराची कारणे, लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाय व वेळेवर तपासणीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. तसेच डॉ. अनिल देशमुख यांनी ग्राहक हक्क व कायदे याविषयी माहिती देत विद्यार्थ्यांना जागरूक राहण्याचे आवाहन केले.
यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांची रक्ततपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण १५० विद्यार्थ्यांची थेलेसेमिया तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक तपासणीमुळे आजाराची लवकर ओळख होऊन पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
या प्रसंगी रोटरी क्लब पाचोरा–भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव व जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल देशमुख, रोटरी सदस्य डॉ. गोरख महाजन, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. कुणाल पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, संजय कोतकर, ज्ञानेश्वर पाचोळे तसेच शाळेचे मुख्याध्यापक आर. जी. सावंत सर उपस्थित होते. शाळेतील शिक्षकवृंद—व्ही. एम. गरुड, एस. एल. पाटील, डी. टी. पाटील, टी. आर. पाटील, श्रीमती एस. पी. पाटील, श्रीमती एस. एस. पवार, डी. आर. कोळी, एस. आर. बागुल, आर. आर. पाटील, श्रीमती जे. जे. पाटील, आर. ए. पाटील, एन. एम. वाघ, एस. एल. चव्हाण, एस. के. वाघ, श्रीमती एस. आर. बोरसे, श्रीमती एस. के. अहिरराव, डी. एफ. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
आरोग्यविषयक जनजागृतीसाठी रोटरी क्लब व ग्राहक पंचायत यांनी घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली











