पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
रोटरी क्लब पाचोरा-भडगावच्या वतीने आयोजित ‘हॅप्पी स्ट्रीट’ खेळ महोत्सवात बालपणीच्या पारंपरिक खेळांचा अनुभव घेण्यासाठी पाचोरा-भडगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली यांच्या संकल्पनेतून मोबाईल आणि सोशल मीडियापासून काही काळ दूर राहून, आपले पारंपारिक खेळ समजून घेण्याच्या उद्देशाने हा अनोखा व मोफत उपक्रम ‘बचपन से लेके पचपन तक’ या संकल्पनेखाली यशस्वीरित्या पार पडला.
पारंपरिक खेळांची पर्वणी:
या महोत्सवात लगोरी, गोट्या, रस्सीखेच, टायर खेळणे, मानवी सापशिडी, भवरा (भिंगरी), विट्टी-दांडू, मामाचे पत्र हरवले, आणि महारांगोळी अशा अनेक बालपणीच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने नागरिकांनी आपले बालपण पुन्हा एकदा जगण्याचा आनंद घेतला.
वर्ल्ड रेकॉर्डसाठी महारांगोळी:
या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरली ती १४५० चौरस फूट आकाराची भव्य-दिव्य ‘महारांगोळी’. कलाछंद आर्ट टीमने रोटरीची यावर्षीची थीम वापरून, सलग ९ तास मेहनत करून, ५५० किलो रांगोळी वापरून ही रांगोळी साकारली. यात २० कलाकारांनी सहभाग घेतला होता. या रांगोळीने वर्ल्ड रेकॉर्डसाठी दावा केला असून, तिची नोंदणी करण्यात आली आहे. या रांगोळीभोवती मानवी साखळी बनवून उपस्थितांनी ‘युनाईट फॉर गुड’ असा एकतेचा संदेश दिला.यातील मुख्य कलाकार शैलेश कुलकर्णी, सहकलाकार उन्नती पाटील,देवश्री कासार,स्वरा रानडे,वैष्णवी पाटील,श्रुती सोनकुळे,सत्यजीत पाटील,साई कोळी,ओमकार केंदळे,किर्तीकुमार सोनवणे,निरज जोशी,ओम सोनकुळे,देवांगिनी मोकाशी,अमन कुमार शाह,विद्या कोतकर,डॉ प्रतिभा तेली,पिंकी जिनोदिया,निधी नैनाव या सर्वांनी मिळून रांगोळी काढली.
उपक्रमाला सहकार्य:
या आयोजनासाठी पाचोरा डॉक्टर्स असोसिएशन, पाचोरा पोलीस स्टेशन, जेसीआय पाचोरा, रोट्रॅक्ट क्लब पाचोरा-भडगाव आणि अनेक शिक्षक संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभले.
मान्यवरांची उपस्थिती:
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पी. आय. राहुल पवार उपस्थित होते. त्यांच्यासोबत पाचोरा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी यांच्यासह डॉ. अमोल जाधव, डॉ. गोरख महाजन, डॉ. अतुल पाटील, डॉ. प्रशांत सांगडे, डॉ. कुणाल पाटील, डॉ राहुल झेरवाल डॉ. राहुल काटकर, डॉ. सिद्धांत तेली, रावसाहेब पाटील, डॉ. घनश्याम चौधरी, संजय कोतकर, डॉ. अंकुर झवर, डॉ. विशाल पाटील, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. पंकज शिंदे, डॉ. शिवाजी शिंदे, चिंतामण पाटील, नितीन जमदाडे, नितीन तायडे, शैलेश कुलकर्णी, पिंकी जिनोदिया, ज्ञानेश्वर पाचोळे, प्रा अमोल झेरवाल आदी रोटरी सदस्य उपस्थित होते. तसेच, पाचोरा डॉक्टर्स असोसिएशनचे चेअरमन डॉ. जीवन पाटील आणि इतर सदस्य तसेच अनेक शिक्षक, पोलीस स्टेशनचे पदाधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती लाभली.
सूत्रसंचालन व संयोजन:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रताप पांडे, विजय ठाकूर, योगेश वाणी यांनी केले, तर स्पर्धा समन्वयक म्हणून गिरीश पाटील, राजेंद्र पाटील, भावेश अहिरराव, सुशांत जाधव, कृष्णा साळुंखे, वाल्मिक पाटील, निवृत्ती तांदळे, स्वप्नील बागुल, अभिषेक भावसार, महेश रोकडे, समाधान पाटील, स्वप्नील माने, वासुदेव चव्हाण, राजेंद्र पिंपळसे यांनी यशस्वीरित्या जबाबदारी सांभाळली.












