‘प्रणाली सोलर सिस्टिम’चा सौर ऊर्जा उपक्रम: लाईट बिल शून्य करून स्वतःची ऊर्जा तयार करा!
पाचोरा: (प्रा अमोल झेरवाल)
आजच्या काळात सौर ऊर्जा ही काळाची गरज बनली आहे. विजेच्या वाढत्या दरामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसते. याच पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील नामांकित ‘प्रणाली सोलर सिस्टिम’ने नागरिकांना मोठा दिलासा देणारा उपक्रम हाती घेतला आहे. ‘प्रणाली सोलर सिस्टिम’चे संचालक आणि टाटा कंपनीचे अधिकृत डीलर श्री. समाधान मुळे यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या घरांवर ‘सोलर रूफ टॉप’ बसवावा, यासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे.
‘प्रणाली सोलर सिस्टिम’ येथे सर्व प्रकारचे सौर ऊर्जेचे साहित्य उपलब्ध आहे. नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार रूफ टॉप सोलर पॅनल अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. या उपक्रमांतर्गत ग्राहकांना भरघोस सूट आणि भरपूर आकर्षक ऑफर देण्यात येत आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासकीय सबसिडीही उपलब्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांचा खर्च कमी होणार आहे.
श्री. समाधान मुळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, “सौर ऊर्जेचा वापर करून आपले लाईट बिल शून्य करा आणि आपली ऊर्जा आपणच तयार करा. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि खर्चात बचत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी सोलर रूफ टॉप बसवून या उपक्रमात सहभागी व्हावे.”
या विशेष ऑफरचा लाभ घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी आजच ‘प्रणाली सोलर सिस्टिम’, पाचोरा येथे भेट द्या किंवा खालील क्रमांकावर संपर्क साधा:
संपर्क: 9665949211











