पाचोरा | प्रतिनिधी
हाडांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा आणि रोटरी क्लब पाचोरा-भडगाव (RID 3030) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.०० या वेळेत सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात येणार आहे.
हाडांची झीज, ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) तसेच भविष्यातील फ्रॅक्चरचा धोका ओळखण्यासाठी बोन मिनरल डेन्सिटी (BMD) तपासणी अत्यंत उपयुक्त मानली जाते. वाढते वय, कॅल्शियमची कमतरता आणि जीवनशैलीतील बदलांमुळे अनेकांना हाडांच्या समस्या उद्भवत असून, अशा व्यक्तींना या मोफत तपासणीचा मोठा लाभ होणार आहे.
हे शिबिर विशेषतः ४० वर्षांवरील नागरिक, पूर्वी हाड मोडलेले रुग्ण, स्नायूंची कमजोरी असलेले, पाठदुखीचा त्रास असलेले, सतत थायरॉईडची औषधे घेणारे तसेच हातापायात मुंग्या येणे किंवा पकड कमी झाल्याची समस्या असलेले नागरिक यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
“हाड मोडण्याची वाट कशाला पाहायची… आजच तुमच्या हाडांची मोफत तपासणी करून घ्या,” असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिरासाठी आगाऊ नोंदणी करण्यासाठी ७७०९६०५७६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हे शिबिर सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, पहिला मजला, एस. एस. पाटील कन्स्ट्रक्शन ऑफिस, गजानन पेट्रोल पंप समोर, महाराणा प्रताप चौक, पाचोरा येथे होणार आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष रोटेरियन डॉ. शिवाजी शिंदे, सेक्रेटरी अॅडमिन रोटेरियन डॉ. स्वप्नील पाटील, सेक्रेटरी प्रोजेक्ट्स रोटेरियन डॉ. प्रशांत सांगडे तसेच रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहेत.
हाडांच्या आरोग्याची वेळेत तपासणी करून भविष्यातील गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी नागरिकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिद्धिविनायक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.











