पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
पाचोरा तालुक्यात यंदाच्या इयत्ता 10 वी (SSC) व 12 वी (HSC) बोर्ड परीक्षा गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अत्यंत काटेकोरपणे आणि नियमानुसार पार पडल्या. प्रांत अधिकारी भूषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे, गट विकास अधिकारी सुधाकर मुंढे,उप विभागीय पोलीस अधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्या सहकार्याने संपूर्ण परीक्षा प्रक्रियेदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले होते.
परीक्षा कालावधीत सर्व केंद्रांवर शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने कामकाज पार पडले. गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी वेळोवेळी केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या. गेल्या दोन महिन्यांपासून परीक्षेच्या पूर्वतयारीपासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्व कामकाज प्रामाणिकपणे आणि बोर्डाच्या नियमांनुसार करण्यात आले.
प्रत्येक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच, प्रत्येक वर्गात पर्यवेक्षकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांना वारंवार सूचना देण्यात आल्या, ज्यामुळे परीक्षा प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहिली नाही. केंद्रप्रमुखांकडूनही काटेकोर नियोजन करून घेण्यात आले आणि ‘कॉपीमुक्त अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले.
विजय पवार यांनी स्वतः सर्व परीक्षा केंद्रांवर तालुका नियंत्रण कक्ष व वॉट्सअप जि पी एस ग्रुपमार्फत लक्ष देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण परीक्षा प्रक्रिया शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने पूर्ण झाली.
परीक्षा संपल्यानंतर गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी सर्व केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
अशा प्रकारचे सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक तालुक्यात असल्यास विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यास मोठी मदत होईल, असा सूर शिक्षक व संबंधित घटकांमध्ये व्यक्त होत आहे.राजू सूर्यवंशी,नितीन भालेराव ,भागवत कोरे, दिलीप अहिरे या शिक्षकांनी तसेच मुख्याध्यापक एन आर पाटील, तालुका अध्यक्ष किरण पाटील सर यांचेसह विभागातील सर्व शिक्षक -कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तहसीलदार विजय बनसोडे परीक्षा केंद्र भेटीदरम्यान










