जळगाव | प्रा अमोल झेरवाल
येथील जुन्या औद्योगिक वसाहत मधील सिद्धिविनायक विद्यालयात मुळजी जेठा महाविद्यालय भौतिकशास्त्र विभाग व मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने विज्ञानाचा प्रचार प्रसार आणि विज्ञानामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी आठवी, नववी आणि दहावीतील २२५ विद्यार्थ्यांना विविध उपलब्ध साहित्याचा आधार घेऊन प्रकाशाच्या गुणधर्मावर आधारित दाब, जडत्व, केंद्रगामी हवेचा भवरा, केंद्र उदगामी हवेचा भवरा, कसे निर्माण होतात याची प्रात्यक्षिक माहिती प्राध्यापक दिलीप भारंबे (सेवानिवृत्त शिक्षक व मराठी विज्ञान परिषद सचिव) यांनी दिली.
मुळजी जेठा महाविद्यालयातील द्वितीय वर्ष विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी पवनचक्की विद्युत निर्मिती, टू स्ट्रोक इंजिन, फोर स्ट्रोक इंजिन या विषयावर आधारित प्रयोग दाखवून विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने माहिती सादर करुन प्रचार प्रसार केला .
प्रा. डॉ. विशाल भारुड यांनी आपल्या मनोगतात मराठी विज्ञान परिषदेच्या व मुळजी जेठा महाविद्यालयाच्या वतीने विज्ञानाचा प्रचार प्रसार आणि शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण करण्यासाठी व भविष्यात विज्ञान क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. प्रेमजीत जाधव यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांमध्ये असलेल्या विज्ञानाच्या संकल्पना स्पष्ट केल्या, भविष्यात विज्ञान, भौतिकशास्त्र आणि गणित विषयात असणाऱ्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. संजय भारंबे सर आणि उपप्राचार्य प्रा. मनोजकुमार चोपडा सर यांचे मार्गदर्शन लाभले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिद्धिविनायक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री .आर.पी खोडपे सर, उपस्थित होते याप्रसंगी प्रा. दिलीप भारंबे सर (सचिव मराठी विज्ञान परिषद जळगाव) ,प्रा.रवींद्रसिगंं पाटील सर (संस्थापक उपाध्यक्ष मराठी विज्ञान परिषद जळगाव),प्रा.डॉ.विशाल भारुड सर (समन्वयक भौतिकशास्त्र विभाग मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव),प्रा.डॉ.प्रेमजीत जाधव सर (भौतिक शास्त्र मुळजी जेठा महाविद्यालय जळगाव) हे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रा.खेमराज पाटील यांनी केले.












