पाचोरा | प्रा अमोल झेरवाल
रोटरी क्लब पाचोरा-भडगाव यांच्या वतीने सामाजिक दायित्व जपत पाचोरा रेल्वे स्टेशन येथे वयोवृद्ध, आजारी व दिव्यांग प्रवाशांच्या सोयीसाठी २ व्हीलचेअर व २ स्ट्रेचर भेट देण्यात आले. ही सेवा सामग्री रो. प्रा. नितीन सोनवणे यांच्या सौजन्यातून, त्यांच्या कै. आई-वडिलांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्घाटन व वितरण कार्यक्रमात रेल्वे विभागाचे जनरल मॅनेजर विवेक कुमार गुप्ता, भुसावळ डीआरएम निखिल अग्रवाल, तसेच पाचोरा स्टेशन प्रबंधक विजय पाटील यांच्यासह रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमात रोटरी क्लब पाचोरा-भडगावचे अध्यक्ष डॉ. मुकेश तेली, सचिव डॉ. अजयसिंग परदेशी, तसेच रोटरी सदस्य भरत सिनकर, प्रा. नितीन सोनवणे, निलेश कोटेचा, डॉ. गोरख महाजन, डॉ. बाळकृष्ण पाटील, डॉ. अमोल जाधव, पिंकी जिनोदिया, संजय कोतकर, डॉ. सिद्धांत तेली, डॉ. राहुल काटकर, नितीन जमदाडे, नितीन तायडे, उज्वल ठाकरे, पुंडलिक पाटील, ज्ञानेश्वर पाचोळे, लक्ष्मण जाधव, चेतन सरोदे, लिलाधर सरोदे आदी उपस्थित होते.
याशिवाय अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांत सचिव डॉ. अनिल देशमुख, तालुकाध्यक्ष संजय पाटील, शरद गीते, चिंधु मोकळ, सुधाकर पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
रेल्वेचे जनरल मॅनेजर विवेक कुमार गुप्ता यांनी रोटरी क्लबच्या या सेवाभावी कार्याचे विशेष कौतुक करून, प्रवाशांच्या सुविधेसाठी करण्यात आलेल्या या योगदानाचा उल्लेख केला. कार्यक्रमाच्या शेवटी रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशन प्रबंधक विजय पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हा उपक्रम म्हणजे समाजातील गरजू घटकांना आधार देणाऱ्या रोटरीच्या सेवाभावी कार्याची प्रेरणादायी उदाहरण ठरत असून, प्रवाशांना प्रत्यक्ष उपयोगी ठरणारी सुविधा रेल्वे स्टेशनवर उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.











