पाचोरा (प्रा अमोल झेरवाल):
येथील ग्राम विकास मंडळ संचलित ग्राम विकास विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती जया माधव मांडेवाल यांचा सेवानिवृत्ती निमित्त ‘सेवापूर्ती सोहळा’ काल, सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. प्रदीर्घ आणि समर्पित सेवेनंतर त्या सेवानिवृत्त झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या मधुर स्वरात स्वागत गीताने करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम विकास मंडळाचे माजी अध्यक्ष पी. एस. पाटील होते. तर सेवानिवृत्त मुख्याध्यापक एम. बी. गरुड यांच्या शुभहस्ते श्रीमती मांडेवाल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष पी. बी. पाटील, चिटणीस एस. व्ही. गिते, माजी अध्यक्ष एस. टी. गिते, माजी मुख्याध्यापक बी आर महाजन, माजी उपसभापती श्रीमती रत्नप्रभा अशोक पाटील, तसेच संस्थेचे आजी – माजी संचालक, माजी मुख्याध्यापक, श्रीमती जया मॅडम यांचे पती विलासराव शंकरराव पवार व मुलगा कुंदन विलासराव पवार (IES officer) तसेच ग्रामविकास विद्यालयाचे प्राचार्य पी जे तेली, खासगी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक एस एस महालपुरे, उप प्राचार्य प्रा पी ओ चौधरी, पर्यवेक्षक पी आर देशमुख, पी ए जाधव व समस्त शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
गौरवगाथा आणि सत्कार
श्रीमती जया मांडेवाल यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाचे यावेळी मान्यवरांनी कौतुक केले. मॅडम यांच्या कार्याचा गुण गौरव माजी मुख्याध्यापक बी आर महाजन यांनी मांडला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष महोदयांनी सांगितले की, “शिक्षिका म्हणून मांडेवाल मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून त्यांची रिक्त झालेली जागा भरून काढणे कठीण आहे.” सत्काराला उत्तर देताना श्रीमती मांडेवाल भावूक झाल्या होत्या, त्यांनी आपल्या प्रदीर्घ प्रवासातील आठवणींना उजाळा देत सहकारी आणि संस्थेचे आभार मानले.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला ॲड. पंकज दत्तात्रय पाटील, सुभाष विठ्ठल बडगुजर, कृष्णा माधव मांडेवाल, शाम शंकर पवार, किरण वसंतराव बडगुजर, भगवान देवचंद पाटील आणि शिवाजी गुलाब बडगुजर यांसह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
नियोजनाची यशस्वी धुरा
कार्यक्रमाचे नियोजन सेवापूर्ती सोहळा समितीचे सदस्य अर्जुन सावळे, प्रदीप पाटील, मनोज बडगुजर, प्रा नितीन मोरे, मंगला साळुंखे, सादिक शेख व मयुर क्षिरसागर यांनी अत्यंत नेटकेपणाने केले. विद्यालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पाटील व आभार प्रदर्शन मनोज बडगुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.














