पाचोरा (प्रा अमोल झेरवाल)
दि. २९ जून २०२६
महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांचे ए.आय.च्या माध्यमातून बनावट फोटो तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ भाजप पाचोरा-भडगाव विधानसभा प्रमुख अमोल पंडितराव शिंदे, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व वैशालीताई सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा शहर व तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी पाचोरा पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
यावेळी पाचोरा नगरपालिका गटनेते तथा नगरसेवक सूरज वाघ, पाचोरा मंडळ अध्यक्ष दीपक माने, नगरदेवळा मंडळ अध्यक्ष गोविंद शेलार, सरचिटणीस जगदीश पाटील, समाधान मुळे नगरसेवक राहुल गायकवाड, नगरसेवक गोपाल वासवानी, नगरसेवक अविनाश सुतार, ज्येष्ठ पदाधिकारी अनिल येवले , गणेश झंझाटे, अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष टिपू देशमुख, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश भैय्या ठाकूर, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विरेंद्र चौधरी, उमेश हटकर, शहर चिटणीस प्रदीप पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष रोहन मिश्रा, माजी युवा शहराध्यक्ष लकी पाटील, शहर चिटणीस मोसीन पठाण निलेश कुंभार, आदेश झंझाटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
बनावट फोटो तयार करून समाजात दिशाभूल व बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांवर आयटी ॲक्ट व सायबर कायद्याअंतर्गत तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.












